Sat, Nov 17, 2018 20:40होमपेज › National › मोदींच्या परवानगीशिवाय सीबीआयने रिपोर्ट बदलदला हे अविश्वसनीय  

मोदींच्या परवानगीशिवाय सीबीआयने रिपोर्ट बदलदला हे अविश्वसनीय  

Published On: Sep 14 2018 6:39PM | Last Updated: Sep 14 2018 6:10PMनवी दिल्‍ली : वृत्तसंस्‍था

भारताला ९ हजार कोटींचा चुना लावून पळून गेलेला विजय मल्‍ल्‍याने पळून जाण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतल्याचा गौप्यस्‍फोट केला होता. त्यानंतर आता सीबीआयने परस्पर लूक आऊट नोटीसीत बदल करुन मल्याला पळून जाण्यास अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोपदेखील विरोधी पक्ष करत आहेत. 

सीबीआय लूक आऊट नोटीसमधील बदलावरून  काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेटली यांच्यावर जोरदार हल्‍ला चढवला. राहुल गांधी यांनी यावेळी मल्‍ल्‍या पळून जाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीच कारणीभूत आहेत. सीबीआय ही थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करते त्यामुळे मोदी यांच्या परवानगीशिवाय मोदी पळून जाऊच शकत नाही. पंतप्रधांनांवर असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यामुळे सर्व भारतीयांचा अपमान झाला असल्याचेही त्यांनी म्‍हटले आहे. 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या आरोपाचे खंडन केले आहे.