होमपेज › National › भाजपा मंत्र्याची अधिकाऱ्याशी हुज्जत(Video)

भाजपा मंत्र्याची अधिकाऱ्याशी हुज्जत(Video)

Published On: Apr 19 2019 11:50AM | Last Updated: Apr 19 2019 11:59AM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेलिकॉप्टर तपासल्याप्रकरणी आयएएस अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर, आता पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली असता प्रधान यांनी त्या अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मंगळवारी ओडिशातील संबलपूर येथे पोहोचल्यानंतर प्रधान यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाचे भरारी पथक घटनास्थळी पोहचले. भरारी पथकाने त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली परंतु प्रधान यांनी त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरूवात केली. प्रधान यांनी पथकाला अर्वाच्य भाषेत दटावल्यानंतर अधिकारी हेलिकॉप्टर न तपासताच परत फिरले. अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी केली, नसल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. 

त्यांचा हा व्हिडिओ बिजू जनता दल पक्षाचे प्रवक्ते सस्मीत पत्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.