Tue, Jul 07, 2020 21:02होमपेज › National › श्री लंकेतून बोटीने निघाले अतिरेकी 

श्री लंकेतून बोटीने निघाले अतिरेकी 

Published On: May 27 2019 1:40AM | Last Updated: May 27 2019 1:38AM
नवी दिल्ली : पीटीआय

‘इसिस’चे दहशतवादी श्रीलंकेतून समुद्रमार्गे केरळमध्ये घुसण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेने वर्तविल्याने   केरळच्या किनापरट्टीवर रविवारी हायअ‍ॅलर्ट पुकारण्यात आला असून तटरक्षक दलासह मच्छिमारांनाही सावध करण्यात आले आहे.

श्रीलंकेच्या अधिकार्‍यांनी 23 मे रोजी भारतीय गुप्तचर यंत्रणेला ही माहिती दिली.  पांढर्‍या बोटीतून 15 अतिरेकी लक्षद्वीपकडे निघाल्याची माहिती त्यांनी दिल्याचे केरळच्या पोलिसांनी सांगितले. 

दहशतवादी हल्ल्यापासून सावध राहण्याची सूचना नेहमीच दिली जाते. मात्र, यावेळी जी माहिती देण्यात आली आहे, ती खूपच गंभीर आहे. आम्हाला मिळालेल्या सूचनेत  दहशतवादी किती आहेत, कोठून निघाले, कोठे पोहोचणार, याबाबतचे बारीकसारीक तपशील आहेत. त्यामुळेच आम्ही कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. हा संभाव्य हल्ला रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आल्याचेही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.