Tue, Jul 14, 2020 04:44होमपेज › National › दहशतवाद्यांचा CRPF च्या पथकावर  हल्ला, पाच जवान शहीद

दहशतवाद्यांचा CRPF च्या पथकावर  हल्ला, पाच जवान शहीद

Published On: Jun 12 2019 6:48PM | Last Updated: Jun 12 2019 7:05PM
अनंतनाग : पुढारी ऑनलाईन

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग बस स्थानकाजवळ  दहशतावाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे.  या चकमकीत एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.  मिळालेल्‍या माहितीनुसार सध्याही या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गोळीबार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ जवानांच्या तुकडीला दहशतवाद्यांनी अचानक लक्ष्य केले. या हल्ल्यात ६ जवान जखमी झाले. त्यातील पाच जणांना उपचारांदरम्यान वीरमरण आले. 

दोन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. पोलिस आणि सीआरपीएफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत यातील एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात  आहे आहे.

दरम्‍यान, या आधी जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे पाकिस्तानने सोमवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यात एक जवान शहीद झाला होता. तर एक जवान जखमी झाला होता.