होमपेज › National › बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचे नाव मतदार यादीत नाही? 

बॅडमिंटनपटू ज्वालाचे नाव मतदार यादीत नाही? 

Published On: Dec 07 2018 12:03PM | Last Updated: Dec 07 2018 4:09PM
हैदराबाद : पुढारी ऑनलाईन 

भारतात सध्या पाच राज्यात निवडणुका सुरु आहेत. त्यातील तेलंगणा आणि राजस्थान या राज्यांत शुक्रवार (ता. ७) मतदान सुरु आहे. सकाळपासूनच राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यातील नावाजलेल्या व्यक्ती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जात होते. इतर सेलिब्रेटींप्रमाणे भारताची माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा ही देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेली असता तिचे नाव मतदार यादीतच नसल्याने ती निराश झाली. या घटनेची माहिती ज्वालाने आपल्या ट्विटर हँडेलवरुन दिली. 

भारतातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यात निवडणुका होत आहेत. त्यातील राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यांत  मतदान होत आहे. तेलंगणा हे भारतातील सर्वात तरूण राज्य म्हणून ओळखले जाते. २०१४ मध्ये आंध्र प्रदेश पासून वेगळे झाल्यानंतर तेलंगणा या राज्याची निर्मिती झाली. तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी १,८२१ उमेदवार रिंगणात आहेत. भारतातील एक मेट्रोसिटी हैदराबाद ही या राज्याची राजधानी असल्याने तेथे बऱ्याच सेलिब्रेटी व्यक्तींचे वास्तव्य आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या सेलिब्रेटी व्यक्तींची मतदान केंद्रावर जात असतात. या सेलिब्रेटी पैकी एक भारताची बॅटमिंटनपटू ज्वाला गुट्टा ही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेली होती. याची माहिती तिने आपल्या ट्विटर हँडेलवरुन दिली. त्यानंतर लगेच तिने आपले नाव मतदार यादीत नसल्यानचे ट्विट करत आश्चर्य व्यक्त केले. तसेच अशा प्रकाराने कसे काय नि:पक्ष निवडणुका होतील असाही प्रश्न उपस्थित केला.   

हैदाराबादमधील मतदान केंद्रावर दक्षिणेतील सुपर स्टार अल्लू अर्जुन यानेही आपला मतदानाचा हक्क बजावला होता.