Fri, Jul 19, 2019 16:04होमपेज › National › मल्ल्याला झटका; SCने 'ही' याचिका फेटाळली

मल्ल्याला झटका; SCने 'ही' याचिका फेटाळली

Published On: Dec 07 2018 12:50PM | Last Updated: Dec 07 2018 12:50PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतातील विविध बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याला आणखी एका झटका बसला आहे. मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कार्यवाही सुरू केली आहे. त्याला स्थगिती देण्यासाठी मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मल्ल्याची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करून त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी ईडीने कार्यवाही सुरू केली आहे. त्याविरोधात मल्ल्याने आपल्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळली आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयाने ईडीला नोटिस जारी करत मल्ल्या विरोधातील कार्यवाही पुढे चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

विविध बँकांचे ९ हजार कोटी रुपये बुडवून फरार झालेल्या मल्ल्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच्या प्रत्यार्पण संदर्भात लंडन येथील न्यायालयात खटला सुरू आहे. दरम्यान, हल्लीच त्याने ट्वीट करत बँकांचे केवळ मुद्दल फेडण्याची तयारी दाखविली आहे.