Sun, May 26, 2019 14:38होमपेज › National › भय्‍यूजी महाराज अनंतात विलीन (Video)

भय्‍यूजी महाराज अनंतात विलीन (Video)

Published On: Jun 13 2018 1:15PM | Last Updated: Jun 13 2018 4:08PMइंदूर : पुढारी ऑनलाईन

अध्यात्‍मिक गुरू आणि सामाजिक कार्यकर्ते भय्‍यूजी महाराज उर्फ उदयसिंह विश्वासराव देशमुख (वय ५०) यांच्‍या पार्थिवावर इंदूरमध्‍ये अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. 

भय्‍यूजी महाराज यांनी काल १२ जून रोजी गोळी झाडून आत्‍महत्या केली होती. त्‍यांच्‍या पार्थिवावर इंदूरच्‍या मेघदूत मुक्‍तीधाम येथे अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. हजारोंच्‍या संख्‍येने त्‍यांचे अनुयायी यावेळी उपस्‍थित होते. तसेच दिग्‍गज मंडळी, अनेक राजकीय नेते यावेळी उपस्‍थित होते.