Mon, Jun 01, 2020 01:52होमपेज › National › स्पाइसजेट फ्लाइटचे टायर हवेतच फुटले, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग(व्हिडिओ)

स्पाइसजेट फ्लाइटचे टायर हवेतच फुटले, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग(व्हिडिओ)

Published On: Jun 12 2019 5:39PM | Last Updated: Jun 12 2019 5:47PM
जयपूर : पुढारी ऑनलाईन

दुबईवरून येत असलेल्या स्पाइसजेट फ्लाइटच्या लँडिंगच्या आधी विमानाचा टायर फुटला. पायलटच्या ही गोष्‍ट लक्षात येताच त्‍याने राजस्थानच्या जयपूर  आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर इमरजंसी लँडिंग करण्यात आले. पायलटने दाखविलेल्‍या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. 

विमानाचा टायर फुटल्‍याने लक्षात येताच पायलटने याची सूचना एअर ट्रॅफिक कंट्रोल(एटीसी)ला दिली. त्‍यानंतर विमानाचे इमरजंसी लँडिंग करण्यात आले. 

टायर फुटलेलया स्पाइस जेटच्या दुबई-जयपूर फ्लाइट(एसजी 58)मध्ये १८९ प्रवासी होते. सकाळी ९ वाजता लँडिंगनंतर सगळे प्रवासी सुखरूप बाहेर आले. यानंतर घटनेची माहिती डीजीसीएला पाठवण्यात आली. दरम्‍यान, या विमानाने दुबईला जाणारे लोक विमान बदलण्याची मागणी करत आहे.