Tue, Jul 07, 2020 07:28होमपेज › National › 'त्या' बॉम्बस्फोटातून थोडक्यात वाचल्या होत्या शीला दीक्षित

'त्या' बॉम्बस्फोटातून थोडक्यात वाचल्या होत्या शीला दीक्षित

Published On: Jul 21 2019 12:15PM | Last Updated: Jul 21 2019 12:07PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं २० जुलै रोजी निधन झालं. दिल्लीच्या एस्कॉर्ट रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभरातून  राष्ट्रपती यांच्यासह पंतप्रधानपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं ८१ व्या वर्षी निधन झालं. ८० च्या दशकात पंजाबमध्ये पसरलेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून त्‍या थोडक्यात बचावल्या होत्या. असा खुलासा दिक्षीत यांनी त्यांच्या पुस्तकातून केला होता.

८० च्या दशकात शीला दीक्षित पंजाबमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान बॉम्ब स्फोटातून थोडक्यात बचावल्या होत्या. याचा उल्लेख शीला दीक्षित यांनी आपलं पुस्तक सिटीजन दिल्ली, माय टाइम्स माय लाइफमध्ये केला आहे.

२५ सप्टेंबर १९८५ मध्ये ऑपरेशन ब्लूस्टारनंतर पंजाबमध्ये निवडणुका होणार होत्या. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा प्रचार करण्यासाठी त्यांना पंजाबला पाठवण्यात आले होते. रॅलीनंतर शीला दीक्षित बटलाहून अमृतसरसाठी रवाना होत होत्या. शीला दीक्षित यांच्या कारमध्ये बिहारचे खासदार आणि त्यांचा ड्रायव्हर होता. दुपारी एक वाजता शीला दीक्षित यांचा ड्रायव्हरने जेवणासाठी आपली गाडी एका हॉटेलमध्ये थांबवली. शीला दीक्षित हॉटेलमध्ये कोल्ड ड्रिंक पित होत्या. तेव्हा त्यांना स्फोटाचा आवाज ऐकू आला.

शीला दीक्षित यांनी बाहेर पाहिले तर, हा स्फोट ज्या कारमध्ये झाला होता त्याच कारमध्ये काही वेळापूर्वी त्‍या बसल्या होत्या. या कारच्या बाजूला उपस्थित दोन मुलांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी नंतर सांगितलं की, त्यांच्या कारमध्ये टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होता. अशी माहिती दिक्षीत यांनी त्यांच्या पुस्तकातून दिली आहे. 

शीला दीक्षित यांची गाडी त्या दिवशी ड्रायव्हरनं जेवणासाठी थांबवली नसती तर गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांचाही मृत्यू झाला असता. दरम्यान या स्फोटानंतरही त्यांनी निवडणूक प्रचाराची सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पाडली.