Sun, Mar 24, 2019 10:26होमपेज › National › गंगेच्या 'पावित्र्या'साठी सलग ११२ दिवस उपोषण करणारा तपस्वी काळाच्या पडद्याआड 

गंगेच्या 'पावित्र्या'साठी सलग ११२ दिवस उपोषण करणारा तपस्वी काळाच्या पडद्याआड 

Published On: Oct 11 2018 7:43PM | Last Updated: Oct 11 2018 7:43PMदेहराडून : पुढारी ऑनलाईन

प्रदीर्घ कालखंडापासून गंगा नदी स्वच्छता आणि सुरक्षेसाठी सर्वस्व झोकून दिलेला अवलिया काळाच्या पडद्याआड गेला आहे. आयआयटी कानपूरमध्ये प्रोफेसर राहिलेले आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी जीडी अग्रवाल यांचे आज निधन झाले.  ते  ८६ वर्षांचे होते. त्यांना स्वामी सानंद असे म्हटले जात होते. 

स्वामी सानंद गेल्या ११२ दिवसांपासून उपोषणावर होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी पाणी पिणे सुद्धा सोडून दिले होते. स्वामी सानंद गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढत राहिले. त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र सुद्धा लिहिले होते. ऋषिकेश येथील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

गेल्या चार वर्षात गंगेच्या स्वच्छतेसाठी कोणतेही ठोस उपाययोजना न झाल्याने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ फेब्रुवारी २०१८ रोजी पत्र लिहून चांगलेच वाभाडे काढले होते. त्या पत्रातून गंगा स्वच्छतेची पोलखोल केली होती. त्यांनी याच पत्रातून २२ जूनपासून निर्णायक उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. स्वामी सानंद यांनी आपले शरीर एम्सला दान केले आहे.