Fri, Nov 24, 2017 20:03होमपेज › National › सचिन तेंडुलकर पंतप्रधान मोदींच्या भेटीला

सचिन तेंडुलकर पंतप्रधान मोदींच्या भेटीला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा
सचिन तेंडुलकरने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्‍लीत भेट

'सचिन: ए बिलियन ड्रीम्‍स' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सचिन व्यस्‍त

मोदींचा सचिनला 'जो खेले वही खिले' असा मंत्र


नवी दिल्ली : वृत्तसंस्‍था

मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर याने आज दिल्‍लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 'सचिन: ए बिलियन ड्रीम्‍स' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सचिन सध्या व्यस्‍त आहे. आपल्या चरित्रपटाबद्‍दल व त्याच्या निर्मितीबद्‍दल माहिती देऊन सचिनेने मोदींचे आशीर्वाद घेतले.

यावेळी मोदी यांनी सचिनला 'जो खेले वही खिले' असा मंत्र दिला. पंतप्रधानांनी या भेटीबाबत ट्‍वीट करत सचिनचा प्रवास आणि त्याने रचलेले विक्रम प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्‍पद आणि प्रेरणादायी असल्याचे म्‍हटले आहे. 

यावेळी सचिनसोबत पत्नी अंजलीही उपस्थित होती. पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा फोटो सचिनने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’बद्दल पंतप्रधानांना सांगितलं आणि मोदींनी शुभेच्छा दिल्या, असे ट्वीट मास्टरब्लास्टरने केले आहे.

सचिन तेंडुलरकच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ येत्या २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

सचिनच्या या सिनेमाचे दिग्दर्शन जेम्स एर्स्किन यांनी केले आहे. या सिनेमात सचिनसह त्याची पत्नी अंजली, मुलगी, वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्र सिंह धोनीही दिसणार आहेत.