Wed, Apr 01, 2020 07:17होमपेज › National › 'दिल्लीतील हिंसाचार सुनियोजित हल्ला'  

'दिल्लीतील हिंसाचार सुनियोजित हल्ला'  

Last Updated: Feb 28 2020 2:02AM

प्रकाश आंबेडकरनवी दिल्ली :  पुढारी वृत्तसेवा 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दिल्लीत उफाळून आलेल्या हिंसाचारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. विदेशात राहणाऱ्या अनेक भारतीयांची मान हिंसाचारामुळे शरमेने खाली झुकली आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला. 

चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना देणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीसंबंधीही आंबेडकरांनी प्रश्न ​उपस्थित केले. भाजप तसेच काँग्रेसकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशा लोकांचा हवा तेव्हा वापर त्यांच्याकडून केला जातो. दिल्लीतील हिंसाचार ही दंगल नसून सुनियोजित हल्ला आहे. काँग्रेस-भाजप स​मर्थित आरएसएस दहशत पसरवण्याचे काम करीत आहे, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला. हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची मागणीही त्यांनी केली.