Fri, Nov 24, 2017 20:19होमपेज › National › प्रद्युम्‍न हत्‍या:गुन्‍हा कबूल करण्‍यास 'त्‍याला' धमकी

प्रद्युम्‍न हत्‍या:गुन्‍हा कबूल करण्‍यास 'त्‍याला' धमकी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

प्रद्युम्‍न हत्‍या प्रकरणाचा सीबीआयने नुकतीच अकरावीत शिकणार्‍या एका विद्‍यार्थ्याला अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून अनेक खुलासेही पुढे येत आहेत. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. संबंधित विद्‍यार्थ्याने सीबीआय आपणास जबरदस्‍तीने गुन्‍हा कबूल करण्‍यास भाग पाडत असल्‍याचा आरोप केला आहे. 

बाल सुरक्षा अधिकार्‍यांसमोर हा जबाब देताना त्‍या विद्यार्थ्याने म्‍हटले आहे की, 'सीबीआयने त्‍याला धमकावत गुन्‍हा कबुल करण्‍यास सांगितले. तसेच गुन्‍हा कबुल न केल्‍यास त्‍याच्‍या मोठ्‍या भावाला मारण्‍याचीही धमकी दिली आहे.' 

या प्रकरणामध्‍ये रायन इंटरनॅशनल स्‍कूलचा बस कंडक्‍टर अशोक कुमारलादेखील अटक करण्‍यात आली आहे. प्रत्‍येक  पातळीवर सीबीआय कसून तपास करत आहे. सीबीआयने यापूर्वीही एक खुलासा केला आहे. यामध्‍ये सीबीआयने गुरुग्राम पोलिसांवर आरोप करत म्‍हटले होते. गुरुग्राम पोलिसांनी काही तासांतच हत्‍येचा छडा लावण्‍यासाठी स्‍कूल बस कंडक्‍टर अशोक कुमारलाच मारेकरी बनवले. शिवाय या प्रकरणातील पुरावे नष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न देखील केला आहे. ही माहिती उघडकीस आल्‍यानंतर मात्र गुरुग्राम पोलिसांनी आपण कोणताही बनाव केल्‍याचे नसून, संबंधित बस कंडक्‍टरची अटक हा तपासाचा एक भाग असल्‍याचे म्‍हटले आहे.