भारताने अमेरिकेला दिली औषधे; अन्‌ व्हाईट हाऊस बनले पंतप्रधान मोदींचे फॉलोअर

Last Updated: Apr 10 2020 4:57PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलद्वारे सहसा जगातील कोणत्याही नेत्याला फॉलो केले जात नाही. मात्र, आता व्हाईट हाऊसने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फॉलो करण्यास सुरु केले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधे देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे व्हाईट हाऊसने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक अकाउंट तसेच पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे.

वाचा : मुंबई : डोंबिवलीत ५ वर्षांच्या मुलालाही कोरोना
 
विशेष बाब म्हणजे व्हाईट हाऊस आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केवळ १९ हँडलना फॉलो करते. त्यात केवळ ५ विदेशी ट्विटर हँडल आहेत. हे सर्व भारतीय आहेत. पंतप्रधान मोदी एकमेव असे नेते आहेत ज्यांना व्हाईट हाऊस फॉलो करत आहे.

व्हाईट हाऊसने आता ट्विटरवर पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि भारतातील अमेरिकी दूतावासाला फॉलो केले आहे. व्हाईट हाऊस केवळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांच्यासह काही अमेरिकेतील प्रशासनाशी संबधित व्यक्तींना फॉलो करते.

वाचा : कोरोनाचा संसर्ग वाढला; आठ राज्यांत भीलवाडा पॅटर्ननुसार १२०० कंटेन्मेंट झोन 

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. येथील चार लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. तर १० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाची गरज होती. या औषधाचा पुरवठा भारताने सुरु केला आहे.   
  
कोरोना संक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी औषध पुरवठा करून मदत केल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप आभारी असल्याचे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. कठीण समयी सहकार्य अधिक वृद्धिंगत होणे आवश्यक असते. हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन व इतर औषधांचा वेळेत पुरवठा केल्याबद्दल आपण भारत आणि भारतवासीयांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद पंतप्रधान, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. त्यावर पंतप्रधान मोदींनी संकटाच्या काळात मित्र जवळ येतात, असे म्हटले होते. नुकतीच भारत सरकारने २४ औषधे आणि औषध घटकांवरील निर्बंध उठविले आहेत. 

 

वाचा : ​​​​​​​देशव्यापी लॉकडाऊन उठविला जाण्याची शक्यता कमी 

पुणे : गेल्या पाच महिन्यांपासून पगार थकल्याने नवले हॉस्पिटलच्या परिचरिकासह कर्मचारी संपावर


काश्मीर मुद्यावरून गरळ ओकणाऱ्या माजी पंतप्रधानांची मुलांसह त्यांच्याच पक्षातून हकालपट्टी!


सांगली : वारणावतीत गव्यांचा, तर अंबाईवाडीत बिबट्यांचा मुक्तसंचार!


कोल्हापुरात आणखी ३ कोरोनाग्रस्तांची भर 


ओटीटीवर प्रदर्शित होणार पहिला मराठी चित्रपट!


अखेर ठरलं! जयललितांच्या अब्जावधीच्या संपत्तीचे 'हे' असणार वारसदार


इंग्लंडमधील 'बायो सेक्युअर' कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजची संमती!


पुणे : पॅरोल रजेवर सुटलेल्या कैद्याच्या स्वागत रॅलीत पोलिसच सहभागी!


महाराष्ट्र पोलिसांना ‘वंदे मातरम’द्वारे मानाचा मुजरा (Video)


सुरक्षा दलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खातमा