Thu, May 28, 2020 18:28होमपेज › National › पीएम मोदी यांच्या चांगल्‍या कामाचे कौतुक व्हायला हवे : शशी थरूर

पीएम मोदी यांच्या चांगल्‍या कामाचे कौतुक व्हायला हवे : शशी थरूर

Published On: Aug 23 2019 8:45PM | Last Updated: Aug 23 2019 8:45PM
तिरुवनंतपुरम : पुढारी ऑनलाईन

काँग्रेसचे वरीष्‍ठ नेते शशी थरून यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जर चांगले काम करत असतील तर त्‍याचे कौतुक झाले पाहिजे असे म्‍हणत काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे. तसेच जेंव्हा पंतप्रधान मोदी एखादी चूक करतील तेंव्हा आमच्या टीकेला विश्वासार्हता मिळेल असेही त्‍यांनी म्‍हटलय. काँग्रेसमधील दिग्‍गज नेत्‍यांनी आज मोदी यांना खलनायक ठरवू नका असे म्‍हटले होते. त्‍यात आता शशी थरून यांची भर पडली आहे. 

थरूर यांनी एका ट्वीटला उत्‍तर देताना म्‍हटले की, जर तुम्‍हाला माहित असेल तर, सहा वर्षापूर्वीपासून मी हे म्‍हणत आलोय की, जर पंतप्रधान मोदी चांगले काम करत असतील तर त्‍या कामाचे कौतुक झाले पाहिजेल तसेच त्‍यांनी एखादी चूक केली तर आपल्‍या टीकेला विश्वासार्हता मिळेल. तसेच यापुढे बोलताना त्‍यांनी आमच्या पक्षातील नेतेही असाच विचार करत आहेत. जे मी या आधीपासून बोलत आलो आहे. 

आज ज्‍येष्‍ठ काँगेस नेते जयराम रमेश तसेच अभिषेक मनु सिंघवी यांनीही पंतप्रधान मोदी यांना खलनायकासारखे सादर करणे चुकीचे असल्‍याचे सांगत, यामुळे विरोधी पक्ष एकप्रकारे त्‍यांना मदत करत असल्‍याचे म्‍हटले आहे. या आधी जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाच्या महत्‍वाला न स्‍विकारणे तसेच प्रत्‍येकवेळी त्‍यांना खलनायक ठरवण्याने काहीही साध्य होणार नाही असे म्‍हटले आहे.

सिंघवी यांनी रमेश यांच्या वक्‍तव्याचा संदर्भ देत, एक ट्वीट केल आहे. त्‍यामध्ये त्‍यांनी मोदी यांना खलनायकासारखे सादर करण्याला मी नेहमीच विरोध केल्‍याचे म्‍हटले आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत म्‍हणून नाही, तर यामुळे आपणच त्‍यांना मदत करत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे. पुढे त्‍यांनी काम हे नेहमीच चांगले वाईट किेंवा साधारण असते. कामाचे मुल्‍यांकन व्यक्‍तीवरून नाही तर ते कामाच्या आधारे झाले पाहिजे. त्‍यांनी यावेळी उज्‍ज्‍वला योजनेचेही कौतूक केले आहे.

जयराम रमेश यांनी बुधवारी मोदी यांनी २०१४ ते २०१९ या काळात केले ल्‍या कामाला समजून घेण्याची गरज असल्‍याचे सांगत, मोदी सरकारचे मॉडेल पूर्णपणे नकारात्‍मक नसल्‍याचे म्‍हटलेय.