Wed, Jul 08, 2020 01:23होमपेज › National › कलम ३७० हटविण्याचा निर्णय जम्मू- काश्मीर आणि लडाखमधील जनतेच्या फायद्याचा : राष्ट्रपती

कलम ३७० हटविण्याचा निर्णय जम्मू- काश्मीर आणि लडाखमधील जनतेच्या फायद्याचा : राष्ट्रपती

Published On: Aug 14 2019 8:54PM | Last Updated: Aug 14 2019 8:54PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज देशवासीयांना संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणात जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचा उल्लेख केला. हा निर्णय जम्मू- काश्मीर आणि लडाखमधील जनतेच्या हिताचा आहे आणि त्याचा तेथील जनतेला फायदा होईल, असे त्यांनी म्हटले.

जम्मू- काश्मीर आणि लडाखमधील जनतेला आता शिक्षणाच्या अधिकारासंबंधीच्या तरतुदींचा लाभ घेता येईल. लोकांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्र निर्मितीत आणि देशाला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी आपल्या स्तरावर योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

समाजातील शेवटच्या व्यक्तीसाठी भारताची संवेदनशीलता कायम राहिल. देश आपल्या आदर्शांवर ठाम राहिल. देश आपली जीवन मुल्यांचे जतन करेल आणि साहसाची परंपरा पुढे सुरू ठेवेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

तिहेरी तलाक सारख्या अनिष्ठ प्रथा संपुष्टात आणल्याने आपल्या मुलींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे, असेही ते म्हणाले.