Sun, Jul 05, 2020 23:32होमपेज › National › फेल लॉकडाऊनवरुन राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा 

फेल लॉकडाऊनवरुन राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा 

Last Updated: Jun 06 2020 9:04AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर लॉकडाऊन फेल गेल्याची टीका केली. त्यांनी विविध देशांचे लॉकडाऊन आणि कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर याची भारताबरोबर तुलना करणारे आलेख ट्विटवर शेअर करत भारतीतील लॉकडाऊन फेल गेल्याचे म्हटले. 

केंद्र सरकारने मार्चच्या अखेरच्या आठवड्यात भारतात संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले होते. या लॉकडाऊनला जगातील सर्वात मोठे लॉकडाऊन असेही संबोधले गेले. त्यानंतर पाच वेळा केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवला. आता सरकारने अनलॉक वन अंतर्गत टप्याटप्याने लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली आहे. पण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्याच आकडेवारीनुसार भारतात सध्या कोरोना रुग्णवाढीच्या सर्वोच्च बिंदूकडे वाटचाल करत आहे.  

‘आत्मनिर्भर भारत’ हादेखील जुमलाच

याच बाबीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाच आलेख ट्विट करुन युरोपीय देशांमध्ये लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. पण, भारतात लॉकडाऊन संपत आला तरी दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णसंख्या उच्चांक गाठत आहे असे निदर्शनास आणून दिले. राहुल गांधी गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाची स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका करत आहेत. त्यांनी भारताने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील गरीब जनता उद्धस्त झाली आहे असेही मत व्यक्त केले. त्यांनी आपल्या ट्विटला 'फेल लॉकडाऊन काहीसे असे दिसते' असे कॅप्शन दिले आहे. 

फेब्रुवारी महिन्यात भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता त्या काळात केंद्र सरकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनधिकृत भारत दौऱ्याची सरबराई करण्यात व्यस्त होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकार अत्यंत गंभीर धोक्याला गांभिर्याने घेत नाही असे म्हणत टीका केली होती. 

कोरोना उपचार; किमान खर्चाबाबत केंद्राला नोटीस

दरम्यान, गेल्या काही आठवड्यापासून लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली जात आहे. येत्या काही दिवसात अजून शिथीलता आणली जाईल पण, देशातील कोरोना रुग्णवाढीचा दर दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. देशात कोरोनामुळे पहिले 1 हजार मृत्यू हे 48 दिवसात झाले होते. आता हाच दर 1 हजार मृत्यू होण्याचा दर 4 दिवसांवर आला आहे.  भारतात सध्या 2 लाख 26 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर 6 हजार 300 लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.