Tue, Sep 25, 2018 06:41होमपेज › National › लोकसंख्या दिनाचा सल्ला; जास्त मुले जन्माला घाला!

लोकसंख्या दिन; म्हणे जास्त मुले जन्माला घाला!

Published On: Jul 12 2018 10:08AM | Last Updated: Jul 12 2018 10:08AMऐझॉल: पुढारी ऑनलाईन

नुकताच (11 जुलै) जागतिक लोकसंख्या दिवस झाला. या निमित्ताने वाढणारी लोकसंख्या आणि त्यासोबत येणारी आव्हाने यावर चर्चा सुरू असताना. एका स्वयंसेवी संस्थेने चक्क जास्त मुले जन्माला घाला असा अजब सल्ला दिला आहे. 

मिझोरममध्ये जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात राज्यातील सर्वात प्रतिष्ठीत अशा संस्थेने हा सल्ला दिला आहे. यंग मिझोरम असोसिएशनच्या मते राज्यातील लोकसंख्या अन्य राज्यांच्या तुलनेत कमी आहे. संस्थेचे अध्यक्ष वानलालरुआत यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या नागरिकता संशोधन विधेयकाला विरोध करण्यासाठी हे गरजेचे आहे. राज्याची लोकसंख्या वाढली तरच विकास होईल आणि उद्योग येण्याची शक्यता निर्माण होईल. 

मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असलेल्या मिझोरममध्ये जन्मदर हा काळजीचा विषय आहे. राज्यात असे अनेक भाग आहे जे ओस पडले आहेत. तर अनेक भागावर बांगलादेशी नागरिकांना ताबा मिळवला आहे. 2011च्या जनगणनेनुसार मिझोरमची लोकसंख्या 10.91 लाख इतकी आहे. सिक्किमनंतर सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य मिझोरम आहे.