Tue, Oct 24, 2017 16:47होमपेज › National › पनामा पेपर : शरीफ यांच्‍यावरील सुनावणी पुढे ढकलली 

पनामा पेपर:शरीफ यांच्‍यावरील सुनावणी १९ला

Published On: Oct 13 2017 5:20PM | Last Updated: Oct 13 2017 5:20PM

बुकमार्क करा

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन 

पनामा पेपर प्रकरणात भ्रष्‍टाचाराचे आरोप असलेले पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्‍याविरोधातील सुनावणी पुढे ढकलण्‍यात आली. पुढील सुनावणी १९ ऑक्‍टोबरला होणार असल्‍याचे पाकिस्‍तानातील भ्रष्‍टाचार विरोधी न्‍यायालयाकडून सांगण्‍यात आले. 

शरीफ आज न्‍यायालयात हजर राहिले नाहीत. तसेच या प्रकरणाची कार्यवाही न्‍यायाधीश मोहम्‍मद बशीर यांच्‍या खंडपीठात आज सुरु होणार होती. मात्र, सुरक्षा व्‍यवस्‍थेचा मुद्‍दा उपस्‍थित करत वकील विरोध करु लागले. त्‍यामुळे न्‍यायाधीश बशीर न्‍यायालयाच्‍या कक्षातून बाहेर निघून गेले. यानंतर याप्रकरणाची पुढील सुनावणी १९ ऑक्‍टोबरला करण्‍यात आली. 

पनामा पेपर प्रकरणात भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपाखाली दोषी ठरवण्‍यात आल्‍यामुळे नवाज शरीफ यांना पदावरुन हटवण्‍यात आले होते. भ्रष्‍टाचार प्रकरणात शरीफ यांच्‍यासह त्‍यांची कन्‍या मरियम आणि जावई मोहम्‍मद सफदर यांचाही समावेश आहे.  एनबीने यापुर्वीच शरीफ आणि त्‍यांच्‍या कुटुंबीयांवर तसेच वित्तमंत्री इशाक डार यांच्‍यावर गुन्‍हे दाखल केले आहेत.