Wed, Nov 21, 2018 10:09होमपेज › National › पळून जाण्याआधी अरुण जेटलींना भेटलो ; फरार विजय मल्ल्याचा सनसनाटी दावा! 

पळून जाण्याआधी अरुण जेटलींना भेटलो ; फरार विजय मल्ल्याचा सनसनाटी दावा! 

Published On: Sep 12 2018 8:28PM | Last Updated: Sep 12 2018 8:28PMलंडन : पुढारी ऑनलाईन  

बँकाचे कर्जे चुकवून लंडनला फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याने देशातून पळून जाण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांना तडजोड करण्यासाठी भेटलो होतो, असा सनसनाटी दावा केला आहे.  

मल्ल्याने लंडन येथील न्यायालयात बोलताना हा सनसनाटी दावा केला.  मल्ल्या म्हणाला की, मी देशातून पळालो कारण माझी बैठक जीनीव्हामध्ये नियोजित होती, त्यापूर्वी मी अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटलो, बँकासोबत असलेल्या व्यवहारांबाबत तडजोड करायची होती, ही माहिती सत्य आहे.

प्रत्यार्पण खटल्यासंदर्भात मल्ल्याच्या प्रकरणाची लंडनमधील वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुनावणी करून बाहेर आल्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. माल्ल्यावर देशातील विविध राष्ट्रीयीकृत बँकाचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी मनी लाँड्रींगचा गुन्हा नोंद आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.