होमपेज › National › तर पुलवामासारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती झाली असती

तर पुलवामासारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती झाली असती

Last Updated: May 28 2020 11:38AM
श्रीनगर: पुढारी ऑनलाईन

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे पुलवामासारख्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात यश आले आहे. दक्षिण काश्मीरच्या राजापोरा परिसरात गुरुवारी एक IED  स्फोटकांनी भरलेली कार सापडली. यानंतर बॉम्बशोधक पथकाने तातडीने घटनास्थळी येत ही स्फोटके निकामी करण्यात आली. त्यामुळे पुलवामासारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती थोडक्यात टळली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी पुलवामाजवळ एका सॅन्ट्रो कारमध्ये IED स्फोटके भरून घेऊन जात असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. दहशतवाद्यांचा हा कट उधळण्यासाठी ४४ राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि पुलवामा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ही स्फोटके नष्ट करण्यात आली. पुलवामामधील राजपुरा रोडजवळ शादिपुरा इथे ही कार पकडण्यात आली. सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे पुलवामासारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती थोडक्यात टळली आहे. 

गेल्यावर्षी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला अशाच प्रकारे केला होता. त्यावेळीही दहशतवाद्यांनी कारमध्येच बॉम्ब ठेवले आणि कारसह सीआरपीएफच्या ताफ्यात घुसले होते. फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात जवळपास ४५ जवान शहीद झाले होते.