Tue, Oct 24, 2017 16:56
29°C
  Breaking News  

होमपेज › National › सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे उपोषण मागे 

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे उपोषण मागे 

Published On: Aug 13 2017 10:56AM | Last Updated: Aug 13 2017 11:04AM

बुकमार्क करा

मध्य प्रदेश : पुढारी ऑनलाइन वृत्‍त

सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या उंचीविरोधात उपोषणाला बसलेल्‍या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी  आपले उपोषण मागे घेतले आहे. गेल्‍या १७ दिवसांपासून मेधा पाटकर उपोषणाला बसल्‍या होत्‍या. पाटकर यांनी रविवारी सकाळी सरबत पिऊन उपोषण मागे घेतल्‍याचे, धार जेलचे अधीक्षक सतीश कुमार उपाध्याय यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

नर्मदा खोर्‍यातील विस्थापितांच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या मेधा पाटकर यांना ७ ऑगस्‍ट रोजी पोलिसांनी अटक केली होती. सरदार सरोवरावरील धरणाची उंची वाढवली तर नर्मदा नदीच्या परिसरातील सुमारे १९२ गावांना फटका बसेल. जवळपास ४० हजार कुटुंब विस्थापित होण्याची भीती आहे. त्यामुळे या सगळ्यांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार मेधा पाटकरांनी व्यक्त केला होता.

धरणाचे दरवाजे उघडावेत, न्यायाधिकरणाचा निवाडा, न्यायालयाचे विविध आदेश व राज्यांचे पुनर्वसन धोरण यानुसार पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी, भूमिहीन, मच्छिमार, केवट, कुंभार, टरबूजवाडीवाले, छोटे व्यावसायिक, स्वयंरोजगारी, उद्योजकांचे पुनर्वसन करावे तसेच खोर्‍यातील विस्थापितांना हटविण्यासाठी बळाचा वापर करू नये आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.