Tue, Aug 20, 2019 15:41होमपेज › National › भर सभेत हार्दिक पटेलच्या कानशिलात लगावली!(Video)

भर सभेत हार्दिक पटेलच्या कानशिलात लगावली! (Video)

Published On: Apr 19 2019 12:00PM | Last Updated: Apr 19 2019 12:00PM
बलदाणा: पुढारी ऑनलाईन

देशात सध्या जसा उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. तसाच लोकसभेच्या प्रचाराचा जोरही वाढत चालला आहे. त्‍यामुळे राजकीय व्यासपीठावर राजकारण्यांकडून प्रतिस्‍पर्धी उमेदवारांवर आरोप-प्रत्‍यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्‍यातच काही उमेदवारांकडून प्रचाराची पायरी सोडून मारझोड आणि मोडतोड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये भर सभेत काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या कानशिलात लगावली असल्याची घटना घडली आहे. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

गुजरातमधील सुरेंद्र नगर येथे काँग्रेस नेता हर्दिक पटेलची सभा सुरू होती. सुरेंद्र नगर येथील बलदाणा येथे ही जनसभा सुरू होती. व्यासपीठावर हार्दिक भाषण करत असताना अचानक अज्ञात व्यक्तीने व्यासपीठावर येऊन हार्दिकच्या कानशिलात लगावली. 

या घटनेनंतर अज्ञात व्यक्तीला व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीत ती अज्ञात व्यक्ती जखमी झाली असून त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेवर बोलताना हार्दिक पटेलने भाजपवर निशाणा साधला. भाजपवाल्यांना वाटते की मला मारून टाकले पाहिजे पण भाजपचे हे स्वप्न सत्यात उतरणार नाही.