Wed, May 23, 2018 09:04होमपेज › National › अय्यर ‘मेंटली फिट’ नाहीत : लालू यादव 

अय्यर ‘मेंटली फिट’ नाहीत : लालू यादव 

Published On: Dec 07 2017 7:15PM | Last Updated: Dec 07 2017 7:15PM

बुकमार्क करा

दिल्ली : पुढारी ऑनालईन 

मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या ‘नीच’ वक्तव्यावर राहुल गांधी पाठोपाठ लालूप्रसाद यादव यांनीही टीका केली आहे. लालूंनी आपल्या खास शैलीत टीका करताना अय्यर ‘मेंटली फिट’ नाहीत असे वक्तव्य केले आहे.

‘मुझको लगता है की, ये आदमी बहुत नीच किसमका आदमी है, इसमे कोई सभ्यता नही है, ऐसे मोकेपर इस किसमकी गंदी राजनीती करने की क्या आवशकता है?’ असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते मणीशंकर आय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केले होते. या वरुन दिवसभरात बरीच चर्चा झाली. दरम्यान राहुल गांधीनी सांगितल्यावर अय्यरांनी माफी मागितली आहे. मणी शंकर अय्यर माध्यमांशी बोलताना म्हणाले ‘ मी नीच हा शब्दप्रयोग मोदींच्या जातीला उद्देशुन वापरला नव्हता. जर हा जातीवाचक शब्द असेल तर मी माफी मागतो. आणि या सर्व प्रकाराचा एवढा गाजावाजा करण्याची काही गरज नाही मी एक काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आहे.’