Tue, May 30, 2017 04:05
29°C
  Breaking News  


होमपेज › National › जाधव प्रकरणी भारतासमोरचे पर्याय

जाधव प्रकरणी भारतासमोरचे पर्याय

By pudhari | Publish Date: May 19 2017 5:33PM


नवी दिल्ली: वृत्तसंस्था

इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये मिळालेल्या नैतिक विजयानंतर भारत आता कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी धोरण ठरवत आहे.ज्येष्ठ वकिल हरीश साळवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणात भारतासमोर कोणते पर्याय आहेत याची माहिती दिली.  

जाधव प्रकरणात पहिला विजय हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात मिळाला.  आता भारताला जाधव निर्दोष असल्याचे सिद्ध करावे लागेल.  पाकने जाधव यांना चुकीच्या पद्धतीने फाशीची शिक्षा सुनावल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात सिद्ध केले. 

भारतासमोरचा पहिला पर्याय-

साळवे यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात केलेला युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला आणि पाकिस्तानला जाधव यांना राजनैतिक मदत देण्याचे आदेश दिले. जाधव प्रकरणात पाकिस्तानने मानवाधिकाराचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी भारत करु शकतो. 

दुसरा पर्याय-

भारताने केलेल्या दाव्यानुसार इराणमध्ये व्यापारासाठी केलेल्या जाधव यांचे पाकिस्तानने अपहरण केले. त्यानंतर त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला.  लष्करी न्यायालयात खटला सुरु असताना जाधव यांना कोणताही राजनैतिक मदत दिली नाही. 

आता आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानमध्ये सुरु होणाऱ्या खटल्यात भारताला जाधव निर्दोष असल्याचे सिद्ध करावे लागेल. एका सभ्य समाजात ज्या प्रमाणे खटल्याचे कामकाज चालते तसेच पाकिस्ताने जाधव यांच्या बाबत केले पाहिजे, असे साळवे यांनी सांगितले.