Sun, Feb 23, 2020 17:35होमपेज › National › अन् तिला राहुल गांधींसमोर व्यथा मांडताना रडू कोसळले

अन् तिला राहुल गांधींसमोर व्यथा मांडताना रडू कोसळले

Published On: Aug 25 2019 12:07PM | Last Updated: Aug 25 2019 12:39PM
श्रीनगर : पुढारी ऑनलाईन

जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील नेते काल (ता.२४) श्रीनगरमध्ये दाखल झाले होते. मात्र, राहुल यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आले. त्यांना तेथूनच परत दिल्लीला पाठवण्यात आले. परतीच्या प्रवासादरम्यान एका काश्मिरी महिलेने राहुल गांधींसमोर आपल्या व्यथा मांडल्या. आपल्या मुलांच्या व्यथा मांडताना तिला रडू कोसळते. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

“शिक्षण घेणाऱ्या छोट्या छोट्या मुलांचंही घरातून बाहेर पडणे कठीण झालेय…एकमेकांना शोधायला ते जातात तर त्यांनाही पकडले जाते…एक भाऊ हृदय विकाराने त्रस्त आहे, पण १० दिवसांपासून त्यांनाही डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन जाता येत नाहीये…आम्ही खूप त्रस्त आहोत”, अशा शब्दांमध्ये व्यथा मांडताना तिला रडू कोसळते. आम्ही खुप त्रस्त आहोत हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न ती महिला करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 

कश्मीर का दर्द सुनिए...अशी कॅप्शन देत काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका खेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.