Tue, Sep 17, 2019 22:32होमपेज › National › महाआघाडीला धक्का; 'या' नेत्याने पवारांचा फोन उचलला नाही

महाआघाडीला धक्का; 'या' नेत्याने पवारांचा फोन उचलला नाही

Published On: May 21 2019 1:00PM | Last Updated: May 21 2019 1:15PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. यातच आंध्र पद्रेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विविध पक्षीय नेत्यांना भेटण्याचा सपाटा लावला आहे. यातच  त्यांचे प्रतिस्पर्धी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फोन केला असता त्यांचा फोन उचलणे टाळले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. 

एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जगनमोहन रेड्डी यांना फोन केला होता. पण त्यांनी शरद पवारांचा फोन उचलणे टाळले. विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र आणण्यात चंद्राबाबू कंबर कसत आहेत मात्र, जगनमोहन रेड्डी यांच्या या भूमिकेमुळे महाआघाडी अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

वायएसआरमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारांना जगन मोहन यांच्याशी बोलायचे होते. पण जगनमोहन त्यासाठी तयार नाहीत. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत जगनमोहन कोणाशीही चर्चा करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

जगन मोहन यांचे वडील आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर या दोघांशी शरद पवार यांचे जवळचे संबंध आहेत. मात्र काँग्रेससोबत छत्तीसचा आकड आहे असे सांगितले जात आहे. यासाठी या दोघांची जबाबदारी काँग्रेसने पवार यांच्याकडे  देण्यात आली होती. 

एक्झिट पोलनुसार वायएसआरसीपी पक्षाला लोकसभेच्या १८ ते २० जागा मिळू शकतात तर चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला चार ते सहा जागांवर मर्यादीत रहावे लागेल. आंध्रप्रदेशात लोकसभेच्या एकूण २५ जागा आहेत. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex