Tue, Oct 24, 2017 16:55
29°C
  Breaking News  

होमपेज › National › शशिकला VIP ट्रीटमेंट प्रकरण : डी रुपा यांची बदली

शशिकला VIP ट्रीटमेंट प्रकरण : डी रुपा यांची बदली

Published On: Jul 17 2017 4:09PM | Last Updated: Jul 17 2017 4:09PM

बुकमार्क करा


नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाइन वृत्त 

बंगळुरु सेंट्रल जेलमध्‍ये शिक्षा भोगत असलेल्‍या एआयडीएमच्‍या शशिकला यांना मिळत असलेल्‍या व्‍हीआयपी ट्रीटमेंटचा खुलासा करणार्‍या आयपीएस डी रुपा यांची बदली करण्‍यात आली आहे. तसेच जेल एडीजीपी एच. एन. सत्यनारायण राव यांचीही बदली करण्‍यात आली आहे. 

कर्नाटक सरकारने डी रुपा  यांना डीआयडी सेंट्रल जेलमधून स्थानांतरित करुन ट्रॅफिक ॲण्‍ड रोड सेफ्टी कमिश्‍नर पद दिले आहे. यापुर्वी डी रुपा पाराप्‍पना सेंट्रल जेलमध्‍ये शशिकला यांना मिळणार्‍या विशेष सुविधांचा खुलासा केला होता. 

काही दिवसांपुर्वी डी रुपा यांनी याप्रकरणी पोलिस महासंचालक (जेल) एक अहवाल सादर केला होता. या अहवालात शशिकला यांना जेवणासाठी वेगळे किचन यांच्‍यासह इतर विशेष सुविधांसाठी अधिकार्‍यांना २ कोटी रुपये देण्‍याचा आरोप केला होता.  यानंतर मुख्‍यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते.