Wed, Jun 26, 2019 03:14होमपेज › National › भारतीय हवाई दलाचा पुन्हा पाकला इशारा!

भारतीय हवाई दलाचा पुन्हा पाकला इशारा!

Published On: Mar 15 2019 12:02PM | Last Updated: Mar 15 2019 12:02PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकला सडेतोड उत्तर दिले. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये बालकोटमधील दहशवादी तळ उद्धवस्त करण्यात आले. यासोबत पाकचे एफ-16 हे लढाऊ विमान पाडण्यात भारताला यश आले. मात्र पाकिस्तान हार मानायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर, भारतीय हवाई दलाने पंजाब आणि जम्मू-कश्मीरच्या सीमेजवळ प्रात्यक्षिके घेऊन पाकला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

कधीही, कोणत्याही हल्ल्याचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. लढण्यासाठी आपण सज्ज आहोत. यासाठी भारतीय हवाई दलाने पंजाब आणि जम्मू-कश्मीरच्या सीमेवर प्रात्यक्षिके घेतली. 

या प्रात्यक्षिकामागचे कारण भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले आहे. हा एक महत्त्वपूर्ण अभ्यास आहे. कोणाला भिती दाखवण्याचा उद्देश नाही. जर पाकिस्तानकडून कोणता हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यात येईल. या प्रात्याक्षिकामध्ये विविध लढाऊ विमाने सहभागी झाली होती.