Tue, Nov 19, 2019 12:38होमपेज › National › संयुक्‍त राष्‍ट्राचा अहवालानुसार भारतात २७ कोटी लोक गरीबीतून बाहेर 

देशातील २७ कोटी गरीबांना 'अच्छे दिन'

Published On: Jul 12 2019 4:13PM | Last Updated: Jul 12 2019 4:13PM
संयुक्त राष्ट्र : पुढारी ऑनलाईन

भारतात आरोग्‍य, शालेय शिक्षणासहीत अनेक क्षेत्रामध्ये झालेल्‍या प्रगतीमुळे भारतातील मोठी लोकसंख्या गरीबीच्या दलदलीतून बाहेर आली आहे. संयुक्‍त राष्‍ट्राच्या एका अहवालानुसार २००६ पासून २०१६ पर्यत २७.१० कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत. अन्न शिजविण्याचे इंधन, स्‍वच्छता आणि पोषण अशा क्षेत्रात मजबुत सुधारणा झाली आहे. 

संयुक्‍त राष्‍ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि ऑक्‍सफर्ड पावर्टी ॲन्ड ह्‍यूमन डेव्हलपमेंट इनशिएटीव्ह (ओपीएचआई) यांच्याकडून तयार करण्यात आलेल्‍या वैश्विक बहुआयामी गरिबी निर्देशांक (एमपीआई) 2019 गुरूवारी जाहीर केला गेला. यासाठी १०१ देशातील १.३ अब्ज लोकांचा अभ्‍यास करण्यात आला. यामध्ये ३१ किमान उत्पन्न, ६८ मध्यम उत्‍पन्न आणि २ उच्च उत्‍पन्न असलेले देश आहेत. यामध्ये फक्‍त उत्‍पन्नाच्या निकषाचाच विचार केला नव्हता, तर आरोग्‍याची वाईट अवस्‍था कामाची खराब गुणवत्‍ता, आणि हिंसेची भीती या संकेतांच्या आधारावरही अभ्‍यास केला होता. 

सतत विकास लक्षामध्ये गरीबीला सगळ्‍या स्‍वरूपात नष्‍ट करणे असा अर्थ आहे. यामध्ये बांग्लादेश, कम्बोडिया, डेमोक्रैटिक रिपब्लिक ऑफ कांगो, इथियोपिया, हैती, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, पेरू आणि व्हिएतनाम या देशांमधील गरीबीत उल्‍लेखनीयरीत्‍या गरिबीमध्ये कमतरता झाली आहे. 

या अहवालानुसार सर्वात जास्‍त प्रगती ही दक्षिण आशियामध्ये पाहण्यास मिळाली आहे. भारतामध्ये २००६ पासून २०१६ या काळात २७.१० कोटी लोक तर बांग्‍लादेशमध्ये २००४ ते २०१४ या काळात १.९० कोटी लोक हे गरीबीतून बाहेर पडले आहेत. या अहवालात असेही म्‍हटले आहे की, १० निवड केलेल्‍या देशांमधील भारत आणि कम्‍बोडीयाने गरीबीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. 

अहवालात म्‍हटलय की, भारतात गरीबीत कमी करण्याच्या कार्यक्रमात सर्वांधिक सुधारणा झारखंड राज्‍यात पहावयास मिळाली आहे. तसेच पोषण, स्‍वच्छता, मुलांचे शालेय शिक्षण, वीज, शाळेतील उपस्‍थिती, आवास, अन्न शिजविण्याचे इंधन आणि संपत्‍तीमध्ये भारतासोबतच इथिओपिया आणि पेरू या देशांनी उल्‍लेखनीय सुधारणा केल्‍याचे दिसून आले आहे. 

संयुक्‍त राष्‍ट्राच्या अहवालानुसार २००५-२००६ मध्ये भारतात जवळपास ६४ कोटी लोक दारीद्‍यात जगत होते. तेच २०१५-२०१६ मध्ये यात ३६.९ कोटी इतक्‍या प्रमाणात घट झाली आहे. अशा प्रकारे भारताने अनेक विभिन्न स्‍तरावर १० मानकामध्ये मागास लोकाना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी उल्‍लेखनीय प्रगती केल्‍याचे नमुद करण्यात आले आहे.