Mon, Jul 13, 2020 01:38होमपेज › National › देशातील कोरोना बाधितांचा आकडा २ लाखाच्या उंबरठ्यावर 

देशातील कोरोना बाधितांचा आकडा २ लाखाच्या उंबरठ्यावर 

Last Updated: Jun 02 2020 9:37AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज ( दि. २) दिलेल्या माहितीनुसार देशभरात गेल्या २४ तासात ८ हजार १७१ नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या २४ तासात २०४ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. नव्या ८ हजार १७१ कोरोना बाधित रुग्णांमुळे देशाचा एकूण आकडा हा १ लाख ९८ हजार ७०६ वर पोहचला आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा रोजचा आकडा पाहता आज भारत २ लाखाच्या पुढे जाईल. 

दरम्यान, देशातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असला तरी देशाचा रुग्ण बरे होण्याचा वेगही चांगला आहे. भारतात सध्या एकूण १ लाख ९८ हजार ७०६ रुग्णांपैकी पैकी ९७ हजार ५८१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ९५ हजार ५२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत ५ हजार ५९८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.