Sun, Aug 25, 2019 01:46होमपेज › National › 'विष देऊन लालुंच्या कुटुंबालाच संपवायच असेल तर संपवा पण....'

'विष देऊन लालुंच्या कुटुंबालाच संपवायच असेल तर संपवा पण....'

Published On: Apr 20 2019 8:32PM | Last Updated: Apr 20 2019 8:32PM
पाटणा : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालुप्रसाद यादव यांना रुग्णालयात भेटण्यासाठी गेलेले माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सलग दुसऱ्यांदा अडवणूक झाली आहे. 

त्यामुळे बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालुंच्या पत्नी राबडीदेवी चांगल्याच संतापल्या आहेत. राबडी म्हणाल्या, तेजस्वी लालूंना भेटण्यासाठी गेला होता, पण त्याला परवानगी देण्यात आली नाही. लालूंना काही झाल्यास बिहार आणि झारखंडमधील जनता रस्त्यावर उतरेल. जर राज्य सरकार आणि केंद्र सरकार लालूंना विष  देऊन मारणार असतील, तर संपूर्ण कुटुंबालाच ते मारून टाकू शकतात, पण अशी हुकुमशाही चालणार नाही. 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातही तेजस्वी यांना रांचीस्थित रिम्समध्ये भेटण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांना गेटवरूनच माघारी धाडण्यात आले होते. त्यांना पाच वाजल्यानंतर कोणालाच भेटण्याची परवानगी नसल्याचे कारण तेजस्वी यांना देण्यात आले होते. चारा घोटाळ्यात शिक्षा झालेले लालू  रांची इन्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (रिम्स) मध्ये उपचार घेत आहेत.