Tue, Oct 24, 2017 16:52होमपेज › National › हनीप्रीतला १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी 

हनीप्रीतला १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी 

Published On: Oct 13 2017 6:37PM | Last Updated: Oct 13 2017 6:37PM

बुकमार्क करा

पंचकूला : पुढारी ऑनलाईन 

पंचकूला हिंसाचार प्रकरणी हनीप्रीतला १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली. अंबाला जेलमध्‍ये २३ ऑक्‍टोबरपर्यंत हनीप्रीतला पाठवण्‍यात आले आहे. ही शिक्षा हरियाणाच्‍या पंचकुला न्‍यायालयाने सुनावली. हनीप्रीतचा सहकारी सुखदीप कौरलादेखील २३ ऑक्‍टोबरपर्यंत न्‍यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली आहे. 

यापुर्वी १० ऑक्‍टोबरला न्‍यायालयाने हनीप्रीतला आणखी तीन दिवस पोलिस रिमांडवर पाठवले होते. पंचकुला पोलिसांनी हनीप्रीत आणि सुखदीप कौर यांना आज न्‍यायालयात हजर केले असता पोलिसांनी हनीप्रीतचा मोबाईल जप्‍त करण्‍यात आल्‍याचे सांगितले. मात्र, अद्‍याप लॅपटॉप सापडले नसल्‍याचे पोलिसांनी म्‍हटले. 

सुरक्षेच्‍या कारणास्‍तव हनीप्रीतला अंबाला जेलमधूनच व्‍हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्‍या माध्‍यामातून चौकशी होणार असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली आहे.