Mon, Apr 22, 2019 04:14होमपेज › National › 'या' व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना इतिहासात अजरामर!

'या' व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना इतिहासात अजरामर!

Published On: Sep 14 2018 1:54PM | Last Updated: Sep 14 2018 1:49PMनवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

पृथ्वीतलावर अनेक घटना अशा घडल्या आहेत त्या अजुनही स्मरणात आहेत. अनेक रहस्यमय गोष्टींचा उलगडा आजही झालेला नाही. काही अशा रहस्यमय घटना आहेत की, त्या समजल्यावर तुम्ही थोडे संभ्रमात पडाल... तर जाणून घ्या त्या रहस्यमयी गूढ अशा मृत्यूच्या घटना...

अति जेवणामुळे मृत्यू झाला

​ज्यादा खाना खाया और चल बसे

अठराव्या शतकामधील स्वीडनचा राजा अडॉल्फ फ्रेडरिक यांचा मृत्यू अति जेवणामुळे झाला. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय ६० होते. मृत्यूपूर्वी ते इतके जेवले होते की त्यांचे ते खाणे पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कुणालाही वाटले नव्हते त्यांच्या अशा अति खाण्यामुळे मृत्यू झाला. 

दाढीमुळे झाला मृत्यू

​दाढ़ी पर फिसले और चल बसे

दाढीमुळे मृत्यू असे वाचल्यावर आचंबीत व्हाल पण हे सत्य आहे. सोळाव्या शतकामध्ये हंस स्टिनिंगर ही व्यक्ती लांब दाढीमुळे ओळखले जात होते. त्यांची दाढी ४.५ फूट इतकी लांब होती. ते नेहमी दाढी गुंडाळून खिशात ठेवत असत. एका आगीच्या घटनेदरम्यान आपला जीव वाचवण्यासाठी धावताना त्यांच्या लांब दाढीवरूनच पाय घसरला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

प्रात्यक्षिक दाखवताना झाला मृत्यू

डेमो देते वक्त हुई मौत

अमेरिकेमध्ये सिविल वॉरच्या दरम्यान ओहियो नेता क्लीमेंट लायर्ड व्लांदिगम यांचा मृत्यू झाला. ते एका खूनाच्या केसचा तपास करत होते. तेव्हा क्लिमेंट हे खून कसा झाला असावा याचे प्रात्यक्षिक दाखवत होते. यावेळी स्वतःच्याच हातून पिस्तुलमधुन गोळी सुटली आणि त्यांचर मृत्यू झाला.

स्कार्फमुळे(ओढणी) झाला मृत्यू

स्कार्फ बना कातिल

अमेरिकेची लोकप्रिय डान्सर इस्दोरा डंकन हिचा मृत्यू स्कार्फमुळे झाला. ज्या स्कार्फमुळे मृत्यू झाला तो स्कर्फ तिला भेट म्हणून देण्यात आला होता. प्रवासा दरम्यान तिचा स्कार्फ गाडीच्या चाकामध्ये अडकला आणि तिचा मृत्यू झाला.