Wed, Nov 14, 2018 12:12होमपेज › National › राहुल गांधी यांचा ट्विटरवरुन पुन्हा सवाल

गुजरातमध्ये शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष का? : राहुल गांधी

Published On: Dec 07 2017 4:28PM | Last Updated: Dec 07 2017 4:29PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गुजरातमधील शेतकर्‍यांकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी, विमान योजना, पिकांना हमी भाव दिला गेला नाही. उलट त्यांच्या जमिनी काढून घेऊन त्यांना बेरोजगार केले गेले आहे. पंतप्रधानमोदी यांच्या गुजरातमध्ये शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्‍न राहुल गांधी यांनी विचारला आहे. राहुल यांनी ट्विटरवरुन हा प्रश्‍न उपस्‍थित केला आहे.

गत काही दिवसांमध्ये राहुल गांधी यांनी गुजरात संदर्भात विविध प्रश्‍न उपस्थित केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांचा हा नववा प्रश्‍न होता. 

यापूर्वी राहुल गांधी यांनी गुजरातमधील बेरोजगारी, महागाई, वीज, शिक्षण, कुपोषण आदी समस्यांवर प्रश्‍न उपस्थित केले होते. यावेळी त्यांनी गुजरात सरकारचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला आहे. गुजरातमध्ये शेतकर्‍यांना आजपर्यंत कधीही कर्जमाफी मिळाली नाही. पिकांना हमी भाव मिळाला नाही. पिकांना विमा संरक्षण मिळाले नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.