Mon, Aug 26, 2019 14:39होमपेज › National › छातीत दुखू लागल्याने रमण सिंह रुग्णालयात 

छातीत दुखू लागल्याने रमण सिंह रुग्णालयात 

Published On: Jul 24 2019 10:01AM | Last Updated: Jul 24 2019 10:01AM
गुरुग्राम : पुढारी ऑनलाईन

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमन सिंह यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना हरियानातील गुरुग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना रात्री उशिरा रुग्णालयात आणण्यात आले.

रमण सिंह गेली दोन दिवस दिल्लीत होते. सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. मात्र, काल रात्री त्यांना अचानक छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुटुंबियाच्या जवळच्या लोकांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री रमण सिंह सलग तीन वेळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.