Fri, Nov 24, 2017 20:05होमपेज › National › गौरी लंकेश, कलबुर्गी आणि पानसरे हत्येतील पिस्तूल  एकच ?

गौरी लंकेश, कलबुर्गी आणि पानसरे हत्येतील पिस्तूल एकच ?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बंगळुरू : 

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश आणि विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी एक महत्वपूर्ण खुलासा समोर आला आहे. लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये वापरण्यात आलेले पिस्तूल (७.६५ एमएम देशी) हे एकच असल्याचे फॉरेंसिक सायंस लॅबोरेटरीच्या सुरूवातीच्या तपास अहवालात समोर आले आहे. या दोन्ही हत्यांमध्ये वापरण्यात आलेले शस्त्र सारखेच असल्याची जवळपास ८० टक्के खात्री असल्याचे या अहवालाशी संबंधित सुत्राने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. 

विचारवंत आणि हंपी विद्यापीठाचे कुलगुरू एमएम कलबुर्गी यांची धारवाड येथे त्यांच्या निवासस्थानी ऑगस्ट २०१५ मध्ये हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या पिस्तूलचा ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठीही वापर करण्यात आला असल्याची माहिती कलबुर्गी यांच्या हत्येनंतर करण्यात आलेल्या फॉरेंसिक तपासात पुढे आली होती.  म्हणजेच या तिन्ही हत्यांमध्ये एकच शस्त्र वापरले गेल्याची शक्यता आहे. मात्र हे अजून सिध्द व्हायचे आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येसंबंधीचा प्राथमिक तपास अहवाल बुधवारी एसआयटीला सादर करण्यात आला. तपास अधिकाऱ्यांनी बंगळुरू तसेच माओवाद प्रभावित ठिकाणांसह इत्तर ठिकाणी जवळपास ८० च्या वर लोकांची चौकशी केली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.