Wed, Nov 20, 2019 01:30



होमपेज › National › #RamMandir : घटनापीठाला झेड सुरक्षा

#RamMandir : घटनापीठाला झेड सुरक्षा

Last Updated: Nov 09 2019 9:46AM




नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अयोध्या प्रकरणी आज सकाळी साडे दहा वाजता सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. सीजेआयच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ सुनावणी करणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठामध्ये सीजेआय रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती धनंजय वाई चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. 

६ ऑगस्ट ते १६ ऑक्टोबरपर्यंत ४० दिवस सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली होती. अयोध्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने अयोध्यासह देशातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढविली आहे. केंद्र सरकारने पाच न्यायमूर्तींची सुरक्षा वाढवली आहे.