Sun, Aug 25, 2019 01:55होमपेज › National › मतदानादिवशी मोदींचा रोड शो, EC ने मागवला अहवाल  

मोदींचा रोड शो, EC ने मागवला अहवाल  

Published On: Apr 24 2019 9:59AM | Last Updated: Apr 24 2019 11:51AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अहमदाबादमध्‍ये मंगळवारी झालेल्‍या मतदानादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या तथाकथित रोड शो केल्‍याने निवडणूक आयोगाने अहवाल मागविला आहे. निवडणूक आयोगाने गुजरातच्‍या मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे हा अहवाल मागविला आहे. भाजपने आचारसंहितेचे उल्लंघन केल्‍याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

अहमदाबादमध्‍ये लोकसभेच्‍या तिसर्‍या टप्‍प्‍यातील मतदान झाले. प्रसारमाध्‍यमांशी बोलताना वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा म्‍हणाले, याप्रकरणी गुजरातचे मुख्‍य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्‍याकडे अहवाल मागितला आहे. 

सूत्रांच्‍या माहितीनुसार, गुजरातच्या निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी आदर्श निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केलेले नाही. या प्रकरणावर अद्‍याप निवडणूक आयोगाकडून कुठल्‍याही प्रतिक्रिया आलेल्‍या नाहीत.