Sun, Jan 26, 2020 17:55होमपेज › National › अरूणाचल प्रदेशला भूकंपाचा धक्‍का

अरूणाचल प्रदेशला भूकंपाचा धक्‍का

Published On: Jul 20 2019 7:58AM | Last Updated: Jul 20 2019 7:58AM
अरुणाचल प्रदेश : पुढारी ऑनलाईन

अरूणाचल प्रदेशला आज पहाटे भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्‍केलवर या भूकंपाची तीव्रता ५.५ इतकी नोंदवली गेली. 

देशाच्या पूर्वेचे राज्‍य असलेल्‍या अरूणाचल प्रदेशमध्ये आजची पहाट भूकंपाच्या धक्‍यांनी उजाडली. हा भूकंप राज्‍याच्या पूर्व केमांग भागात पहाटे ४:२४ मिनिटांच्या सुमारास झाला. 

पहाटे लोक साखर झोपेत असतानाच आलेल्‍या या भूकंपाने या  डोंगराळ राज्‍यातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.