Sun, Feb 23, 2020 17:20होमपेज › National › 'कलम ३७० ला बाबासाहेबांचा विरोध होता; म्हणून 'बसप'ने ते हटविण्याचे केले समर्थन'

'कलम ३७० ला बाबासाहेबांचा विरोध होता; म्हणून 'बसप'ने ते हटविण्याचे केले समर्थन'

Published On: Aug 26 2019 11:00AM | Last Updated: Aug 26 2019 10:58AM

file photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) सर्वेसर्वा मायावती यांनी संसदेत काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याच्या सरकारच्या निर्णयाला का पाठिंबा दिला, याबाबत खुलासा केला आहे. मायावती यांनी ट्विट करत म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या समानता, एकता आणि अखंडतेच्या बाजूने होते. ते जम्मू- काश्मीर राज्यासाठी वेगळे कलम ३७० ची तरतूद करण्याच्या बाजूने नव्हते. यामुळेच बीएसपीने संसदेत हे कलम हटविण्याचे समर्थन केले.

देशात संविधान लागू झाल्यानंतर तब्बल ६९ वर्षानंतर कलम ३७० समाप्त केले. आता काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य होण्यासाठी निश्चितच थोडा वेळ लागेल. यासाठी थोडी वाट पाहिली तर चांगले आहे. हे कोर्टाने देखील मान्य केले आहे, असेही मायावतींनी म्हटले आहे.

या प्रश्नी मायावती यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काश्मीरध्ये अशा परिस्थितीत परवानगीविना काँग्रेस व अन्य नेत्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काश्मीरमध्ये जाणे हे केंद्र आणि तेथील राज्यपालांना राजकारण करण्यासाठी संधी देण्यासारखा हा प्रयत्न नाही का? तेथे जाण्यापूर्वी थोडा विचार केला असता तर बरे झाले असते, असे मायावती यांनी ट्विटरद्वारे नमूद केले आहे.