Tue, Jan 21, 2020 11:35होमपेज › National › दिल्‍ली मेट्रोत युवतीचा डान्स; डीएमआरसीकडून मनाई 

दिल्‍ली मेट्रोत युवतीचा डान्स; मेट्रो प्रशासनाकडून हटके समज(video)

Published On: Jul 19 2019 3:11PM | Last Updated: Jul 19 2019 3:23PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

दिल्‍ली मेट्रोतून प्रवास करताना फोटो काढणे आणि गाणी वाजवण्याला मनाई आहे. अशा पध्दतीची उद्घोषणाही मेट्रोमध्ये प्रवाशांना केली जाते. मात्र काही लोकांसाठी नियम जणू मोडण्यासाठीच असतात की काय असे दिसते. आता पहा ना चालत्‍या मेट्रोमध्ये टीकटॉक व्हिडीओला मनाई असताना एका मुलीने मेट्रोतच नृत्‍याचा ठेका धरला. इतकच काय तिने याचा टीक टॉक व्हिडीओदेखील बनवला. मग काय हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. खुद्‍द मेट्रो प्रशासनापर्यंत पोहोचला. DMRC ने या प्रकारे डान्स करण्याला मनाई तर केलीच, मात्र थोड्या हटके पध्दतीने... 

मेट्रोकन या प्रकारावर एक ट्वीट करण्यात आलं. यामध्ये एक व्हिडिओही शेअर करण्यात आला. या व्हिडिओवर लिहिलं होतं की, काय आम्‍ही दिल्‍ली मेट्रोमध्ये टीकटॉक व्हिडिओ बनवू शकता? आणि त्‍याच्या खाली पंजाबी गायक दलेर मेहंदीचा GIF टाकण्यात आला. ज्‍यामध्ये गायक दलेर मेहंदी 'ना ना ना ना ना रे' गाण्यावर डान्स करत आहेत. मेट्रोला प्रशासनाला सांगायचे आहे की, तुम्‍ही असे व्हिडिओ बनवू शकत नाही.  

त्‍याच झालं अस की, काही दिवसांपासून एक मुलगी टीकटॉक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर चांगलीच प्रसिध्दीच्या झोतात आली आहे. तिने या आधी बसमध्येही अशाच प्रकारचा व्हिडीओ बनवला होता. या प्रकारानंतर डीटीसी प्रशासन या प्रकाराने नाराज झाले होते. या प्रकाराबद्‍दल प्रशासनाने बस चालकाला निलंबित केले होते. तसेच कंडेक्‍टरला कारणे दाखवा नोटिस बजावली होती. या प्रकारानेही या मुलीला काहीच फरक पडला नाही. आता तर या मुलीने बसनंतर मेट्रोकडे आपला मोर्चा वळवला आणि मेट्रोमध्येही तिने आपल्‍या नृत्‍याचे कौशल्‍य दाखवले. नुसते दाखवले नाही तर तिने याचा टीकटॉक व्हिडीओ बनवून व्हायरल केला. 

मुलीच्या मेट्रोमधील डान्सच्या प्रकारावर दिल्‍ली मेट्रोने वेगळ्‍याच पध्दतीने आपली नाराजी व्यक्‍त केली. यावर मेट्रोच्या प्रवक्‍त्‍याने म्‍हटले होते की, मेट्रोमध्ये या प्रकारच्या कृत्‍यांना डीएमआरसी कदापी मान्यता देणार नाही.