Fri, Mar 22, 2019 23:53होमपेज › National › डान्‍सर चोरट्याने मारला डल्‍ला! (Video)

डान्‍सर चोरट्याने मारला डल्‍ला! (Video)

Published On: Jul 12 2018 11:03AM | Last Updated: Jul 12 2018 11:03AMनवी दिल्‍ली : 

दिल्‍लीतील लाहोरी गेटच्या रंग महाल येथे बुधवारी पहाटे चोरट्यांनी पाच दुकानांवर डल्‍ला मारला. त्यापूर्वी एका चोरट्याने चक्‍क मिथुन चक्रवर्ती प्रमाणे नृत्य केले आणि मग पाच जणांच्या टोळक्याने दुकाने फोडली. विशेष म्‍हणजे हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्‍हीत कैद झाला आहे. 

ही घटना ११ जून रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. येथील रंग महालच्या गल्‍लीत चोरटे नाचत-नाचतच आले. त्यानंतर एका चोरट्याने मिथुन चक्रवार्ती स्‍टाईल नृत्य केले. परंतु पुढे आल्यानंतर सीसीटीव्‍ही असल्याचे समजून तोंडाला रुमाल बांधला आणि पाच दुकानांची शटर तोडून मोबाईलसह पैसे लंपास केले. 

सकाळी दुकानदारांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे, परंतु अद्याप चोरट्यांचा तपास लागला नाही.