Wed, Jul 08, 2020 03:43होमपेज › National › चंदनतस्कर वीरप्पनच्‍या मुलीचा भाजपमध्‍ये प्रवेश 

चंदनतस्कर वीरप्पनच्‍या मुलीचा भाजपमध्‍ये प्रवेश 

Last Updated: Feb 23 2020 10:52AM

 वीरप्पनच्‍या मुलगीचा भाजपमध्‍ये प्रवेश चेन्नई : पुढारी ऑनलाईन

कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनची मुलगी विद्याराणी हिने शनिवारी (ता. २२) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विद्याराणी ही वकील आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव मुरलीधर राव यांनी तिला सदस्य बनविले. तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात तिने भाजपमध्‍ये प्रवेश केला. 

पक्षप्रवेशावर विद्याराणीने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, दोन वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांना मी भेटले होते. तेव्हा त्यांनी भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. यावर मी विचार करत होते. कोणत्याही जाती-धर्माची पर्वा न करता शिक्षणाद्वारे लोकांचा विकास करायचा आहे. कृष्णागिरीमध्ये सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी गेल्या वर्षापासून शाळा चालवित आहे. मोदींच्या लोककल्याणकारी योजनामुळे प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला असल्‍याचे विद्याराणीने सांगितले आहे. 

वीरप्पन आणि मुथ्थुलक्ष्मी यांना दोन मुली आहेत. विद्याराणी ही मोठी तर प्रभा ही धाकटी. विद्याराणी ही २९ वर्षांची आहे. मुथ्थुलक्ष्मी सध्या तामिळनाडूच्या सेलमध्ये त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत. तसेच वीरप्पनला मदत केल्यामुळे पोलिसांनी त्रास दिलेल्या लोकांनाही त्या मदत करत आहेत.