Mon, Mar 25, 2019 21:30होमपेज › National › आता गाई आणि म्‍हशींनाही ‘आधार’ 

आता गाई आणि म्‍हशींनाही ‘आधार’ 

Published On: Mar 13 2018 7:50PM | Last Updated: Mar 13 2018 7:58PMनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

आधार कार्ड अनिवार्य करण्यावरून सध्या देशात गोंधळ सुरु असताना दुसरीकडे गाय आणि म्‍हशींसाठीही १२ अंकी नंबर असलेले आधार कार्ड तयार करण्याच्या हालचाली केंद्रात सुरु आहेत. या आधार कार्डच्या माध्यमातून दुधाळू गाई आणि म्‍हशींची ओळख आणि दूध उत्‍पादन वाढीस चालना देण्याचा हेतु असल्‍याचे सांगण्यात येत आहे. 

देशातील ९ कोटी गाई आणि म्हशींची तपासणी करण्यासाठी १४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी सोमवारी लोकसभेत याबाबत माहिती दिली. सिंह म्‍हणाले, ‘‘ या योजनेमुळे जनावरांचे वैज्ञानिक प्रजनन, रोग प्रसार वाढ रोखणे आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढीचे उद्दीष्ट साध्य केले जाईल.’’

‘‘राष्ट्रीय पशु उत्पादकता मिशनच्या 'पशु संजीवनी' अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने यापूर्वीच पशु आरोग्य आणि उत्पादन संबंधीत नेटवर्क (INAPH) तंत्रज्ञान विकसीत केले आहे. त्‍यातून १२ अंकी ओळख क्रमांक वापरून जनावरांसंबधीत माहिती गोळा करण्याचा प्रयोग सुरु आहे.’’ अशी माहिती सिंह यांनी दिली.