देशात थैमान घातलेल्या कोरोनाने अखेर संसदेतही शिरकाव केलाच!

Last Updated: May 29 2020 1:49PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कोरोना विषाणूने राज्यसभेत शिरकाव केला आहे. राज्यसभेच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. भारतीय संसदेच्या आवारातील ही चौथी कोरोनाची केस आहे. राज्यसभेतील सचिव स्तरावरील एक अधिकारी काल कार्यालयात आले होते. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांमार्फत कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

वाचा : लॉकडाऊनचं काय होणार? अमित शहा आणि पीएम मोदींकडून बैठकांचा जोर

राज्यसभा प्रशासन 'संसदीय सुरक्षा कर्मचारी सध्या संसदेचा संपूर्ण पहिला मजला निर्जंतुकीकरण करत आहे. यामध्ये वॉशरुम, कॉरिडोर, व्हीआयपी गेटचा परिसर आणि स्टोफ गेट भागाचा समावेश आहे. याचबरोबर त्या अधिकाऱ्याचे कार्यालय, लिफ्ट यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.' असे अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. 

वाचा : पीएम मोदींच्या 'मुड'वरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा 'हवेत' गोळीबार?

याचबरोबर प्रशासनाने जे कोणी या अधिकाऱ्याच्या किंवा त्यांच्या वैयक्तिक स्टाफच्या संपर्कात आले आहेत त्यांनी आपल्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवावे अशी विनंती केली आहे. संसदेच्या इमारतीतील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी घटना आहे.