Thu, Jan 17, 2019 08:07होमपेज › National › येडियुराप्‍पांचा शपथविधी रोखता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

येडियुराप्‍पांचा शपथविधी रोखता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

Published On: May 17 2018 7:43AM | Last Updated: May 17 2018 7:46AMनवी दिल्लीः वृत्तसंस्‍था

कर्नाटकमध्ये मतदारांनी राजकीय परिस्‍थिती त्रिशंकू केल्याने कर्नाटकमधील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार असलेले येडियुराप्‍पा यांचा शपथविधी रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या निकालावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून समर्थक आमदारांची यादी तयार करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. याप्रकरणी उद्या १०.३० वाजता पुन्‍हा सुनावणी होणार आहे. यामुळे येडियुराप्‍पांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.  

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे येडियुराप्पांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देण्यात आल्यानंतर काँग्रेस-जेडीएसकडून आक्षेप घेण्यात आला. यानंतर दोन्‍ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सुनावणीची मागणी केली. 

भाजपकडे सत्ता स्‍थापन करण्यासाठी बहुमत नसून त्यांना ११२ आमदारांची आवश्यकता असून त्यांच्याकडे सध्या १०३ आमदार आहेत. काँग्रेस-जेडीएसकडे ११६ आमदार असून सत्ता स्‍थापन करण्यासाठी आम्‍हाला निमंत्रण देण्यात यावे अशी मागणीही काँग्रेस-जेडीएसकडून करण्यात आली आहे.

वाचा : सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात दुसऱ्यांदा मध्यरात्री सुनावणी