Tue, Jul 07, 2020 21:54होमपेज › National › अमेठीत उलटफेरीची शक्यता; राहुल गांधी पिछाडीवर

अमेठीत उलटफेरीची शक्यता; राहुल गांधी पिछाडीवर

Published On: May 23 2019 10:13AM | Last Updated: May 23 2019 10:13AM
अमेठी (उत्तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर आहेत. तर येथे भाजपच्या स्मृती इराणी यांनी आघाडी घेतली आहे. दुपारी अमेठीत स्मृती इराणी ११,२२६ मतांनी पुढे होत्या. त्यांनी गेल्या २०१४ मधील निवडणुकीत राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मात्र राहुल गांधी यांनी निवडणूक जिंकत विजयाची हॅट- ट्रिक केली होती.

येथे १९६७ पासून केवळ दोन वेळा काँग्रेसचा पराभव झाला होता. राहुल गांधी यांनी येथून २००४ पासून खासदार आहेत. २०१४ मधील निवडणुकीत स्मृती यांनी राहुल गांधी यांना जोरदार टक्कर दिली होती. मात्र, राहुल गांधी यांनी अमेठीतून ४ लाख ८ हजार ६५१ मते मिळवत विजय मिळवला होता. तर स्मृती इराणी यांनी ३ लाख ७४८ मते मिळाली होती. तर आपचे कुमार विश्वास यांनी केवळ २५,५२७ मते मिळाली होती.