Tue, Jul 23, 2019 02:10होमपेज › National › पूर्वा एक्स्प्रेस रुळावरून घसरली, १५ प्रवाशी जखमी 

पूर्वा एक्स्प्रेस रुळावरून घसरली, १५ प्रवाशी जखमी 

Published On: Apr 20 2019 7:53AM | Last Updated: Apr 20 2019 8:12AM
कानपूर : पुढारी ऑनलाईन

हावडा येथून नवी दिल्लीकडे जाणारी पूर्वा एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री १२.५० वाजण्याच्या सुमारास कानपूरपासून २० किलोमीटर अंतरावर रुळावरून घसरली. पूर्वा एक्स्प्रेसचे सर्व १२ डबे रुळावरून खाली घसरले आहेत. तर ४ डबे पलटी झाले आहेत. या अपघातात सुमारे १५ लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पूर्वा एक्स्प्रेस नवी दिल्लीकडे जात असताना कानपूर पासून २० किलोमीटरवर असलेल्या रुमा रेल्वे स्थानकाजवळ रात्रीच्या सुमारास घसरली. यामुळे १२ पैकी ४ डबे पलटी झाले आहेत, अशी माहिती उत्तर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अमित मालविवा यांनी दिली.

या अपघातात १५ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, पोलिस अधीक्षक घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे ४५ जणांचे पथक बचावकार्य करत आहेत. पूर्वा एक्स्प्रेसमधील प्रवाशांना कानपूर सेंट्रल पर्यंत विशेष रेल्वेने आणण्यात आले आहे. या अपघातामुळे १३ अन्य रेल्वे गाड्यांच्या मार्ग बदलण्यात आला आहे. तर एक गाडी रद्द करण्यात आली आहे.