गांधी परिवाराची SPG सुरक्षा केंद्राने काढून घेतली

Last Updated: Nov 08 2019 6:05PM
Responsive image
संग्रहित फोटो


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यानंतर आता केंद्र सरकारने गांधी परिवाराला दिलेली SPG सुरक्षा काढून घेतली आहे. SPG सुरक्षा काढून घेतल्यानंतर गांधी परिवाराला झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. हा निर्णय गृह मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचा काँग्रेस पक्षाने निषेध केला आहे. केंद्र सरकारने गांधी परिवारातील राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वड्रा यांच्यासह काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना SPG सुरक्षा दिली होती. जी आता काढून घेतली आहे. 

झेड प्लस सुरक्षतेखाली गांधी परिवाराला सीआरपीएफ कमांडो सुरक्षा देणार आहेत. तर या निर्णयाचा काँग्रेस पक्षाने निषेध केल्यानंतर गृह मंत्रालयाने आपले म्हणणे मांडले आहे. त्यात, महत्वाच्या व्यक्तींना कोणताही धोका होऊ नये म्हणून SPG सुरक्षा दिली जाते. पण सध्या गांधी परिवाराला कोणताही धोका नाही आणि अशा परिस्थितीत झेड प्लसची सुरक्षा त्यांच्यासाठी पुरेशी आहे. तसेच अशा महत्वाच्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा गृह मंत्रालयाकडून घेतला जातो असे स्पष्ट केले आहे. 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर संपूर्ण गांधी कुटुंबाला SPG सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, आता केंद्र सरकारने गांधी परिवाराला दिलेली ही सुरक्षा मागे घेतल्याने आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच SPG सुरक्षा आहे. 

सरकार गांधी परिवाराला त्रास देत आहे : काँग्रेस 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यानंतर आता केंद्र सरकारने  गांधी परिवाराला दिलेली SPG सुरक्षा मागे घेण्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. यावेळी काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी, गांधी परिवाराला दिलेली SPG सुरक्षा काढून घेऊन सरकार गांधी परिवाराला त्रास देत आहे असे म्हटले आहे. तसेच हा निर्णय दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर अल्वी यांनी, गांधी कुटुंबातील दोन लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची ही सुरक्षा काढून घ्यायला नको होती असे ही म्हटले. तसेच भाजप बदला घेण्याचे राजकारण करत असल्याचे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. 

एकनाथ खडसे म्हणतात, 'म्हणून' ८० तासांसाठी फडणवीस मुख्यमंत्री झाले!


मी पक्ष सोडणार नाही; पक्षाने काय तो निर्णय घ्‍यावा : पंकजा मुंडे


गोपीनाथ गडावरून चंद्रकातदादांची 'नाराज' नाथाभाऊंना कळकळीची विनंती!


पंकजा मुंडेंचा पराभव स्वकीयांनीच ठरवून केला; एकनाथ खडसेंचे टिकास्त्र


मुंबई : केक खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा


बापाने केला पोटच्या मुलीवर अत्याचार (video)


'रिझवान’चा संगीत अनावरण सोहळा उत्साहात संपन्न (video)   


पंकजा मुंडेंनी शक्तीप्रदर्शनाने कोणती 'जाहीर' मागणी केली?


#CAB; नागरिकत्व विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव; मुस्लीम लीगकडून याचिका दाखल


नाशिक : मालेगावच्या महापौरपदी ताहेरा शेख